Jaya Ekadashi 2024 : माघ शु् एकदशीला जया एकादशी संबोधले जाते. या एकादशीला पुण्य किंवा मोक्ष देणारी एकादशी मानली जाते.त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वर्षी जया एकादशी २० फेब्रुवारी म्हणजे आज आहे विशेष म्हणजे या एकादशीला आयुष्मान योग आणि प्रीति योग एकत्र येत आहेत. यामुळे चार राशींना याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्या राशी कोणत्या जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष

मेष राशीच्या लोकांना या एकादशीला चांगला फायदा होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. या राशीचे लोक गुंतवणूक करू शकतात. व्यवसायात लाभ मिळू शकतो.आवश्यक सहकार्य मिळाले तर तुमचे कोणतेही काम लवकरात लवकर होईल. कमाईच्या अन्य संधी समोर येऊ शकतात आणि धार्मिक कामात सहभाग वाढेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना जया एकादशी फायदेशीर ठरेल. या लोकांना धनलाभ होण्याचा योग दिसून येत आहे. पैशांची बचत करण्यास हे लोक यशस्वी होतील.जीवनात सुख सुविधा लाभेल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. कुटूंबात सौख्य लाभेल.

हेही वाचा : सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करताच ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार गडगंज पैसा? पद-प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता

तुळ

तुळ राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे त्यांची आर्थिक वृद्धी होईल. कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्य लाभेल.कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. प्रगतीचे मार्ग दिसेल. या जया एकादशीला या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन वाहन किंवा जमीन घर खरेदी करू शकता.

मकर

मकर राशीच्या लोकांना पैसे कमावाण्याच्या नवनवीन संधी मिळतील. अनेक स्त्रोत मिळू शकतात.तुमच्यापेक्षा वयाने लहान लोकांच्या चुका माफ करणे सर्वांसाठी चांगले राहील. कर्जाची परतफेड केल्याने समाधान मिळेल. हे लोक सामाजिक क्षेत्रात सहभागी होतील.कुटूंबात शुभ समारंभ किंवा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya ekadashi 2024 these zodiac signs will get more and more money do you get benefit or become rich know about these lucky rashi ndj
First published on: 20-02-2024 at 09:59 IST