Mesh To Meen Horoscope : ८ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत चालेल. आज दुपारी २ वाजून ४ मिनिटांपर्यंत वैधृती योग जुळून येईल. वैधृती योग कामासाठी चांगला दिवस आहे. जर तुम्हाला व्यस्त काम किंवा प्रवास वगैरे करावा लागत असेल तर तो या योगात करू नये असे सांगितले जाते. मृगाशिरा नक्षत्र शनिवारी संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. याशिवाय ८ फेब्रुवारी रोजी जया एकादशी असणार आहे. हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. तर आज मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

८ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

वृषभ:- मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी.

मिथुन:- क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. आरोग्याबाबत हयगय करू नका.

कर्क:- अपचनाचा त्रास जाणवू शकतो. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.

सिंह:- खेळात अधिक वेळ घालवाल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.

कन्या:- कौटुंबिक कामात गुंतून राहाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

तूळ:- जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. कामाचे समाधान लाभेल.

वृश्चिक:- मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे.

धनू:- तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

मकर:- शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ:- कामाचा ताण राहील. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

मीन:- झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya ekadashi 2025 vishesh aries to pisces horoscope which zodiac signs luck change today read rashi bhavishya in marathi asp