Rashi Bhavishya 29 january 2026 In Marathi : आज २९ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर इंद्र योग जुळून येईल आणि रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. आज जया एकादशी असणार आहे. तर कोणत्या राशीने आज कोणते काम केले पाहिजे जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, २९ जानेवारी २०२६ (Aajche Rashi Bhavishya In Marathi 29 january 2026 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

काही गोष्टींबाबत तोल ढळणार नाही याची काळजी घ्यावी. करमणूकप्रधान कार्यक्रम बघाल. खेळत मन रमेल. मन:शांती लाभेल. घरातील टापटीपीवर भर द्याल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

प्रवास मजेत होईल. संवेदनशीलपणे विचार कराल. सर्व माहिती नीट समजून घ्याल. स्वभावातील लहरीपणा दूर सारावा. नवीन वस्त्रे खरेदी कराल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

बोलण्यातून मार्दवता दाखवाल. आवडीची कामे प्रथम कराल. घरातील कामे आनंदाने कराल. पारंपारिक कामात गढून जाल. कौटुंबिक खर्चाचा विचार करावा.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडाल. गप्पांमध्ये रंगून जाल. चमचमीत पदार्थ खाल. काही गोष्टी भडकपणे दर्शवू नका. हसत-हसत वेळ घालवावा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

चटकन मत दर्शवू नये. चैन करण्यावर भर द्याल. हातातील कामावर लक्ष द्यावे. कामाचा आवाका लक्षात घेवून वेळेचे नियोजन करावे. संयम राखावा लागेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

कामात स्त्रियांची मदत मिळेल. मैत्रीतील आपुलकी वाढीस लागेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा. आधुनिकतेची आवड जोपासाल. कमी श्रमात कामे पार पडतील.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

अपेक्षित लाभाने खुश असाल. मनातील अपेक्षा पूर्ण होतील. मैत्रीचे संबंध जपावेत. आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. कामाला चांगली गती प्राप्त होईल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

तुमची उर्जितावस्था वाढीस लागेल. सरकारी कामे वेळ घेतील. व्यावसायिकांनी अडचणींवर लक्ष द्यावे. निरपेक्ष मदतीचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मतवैचीत्र्य दर्शवू नका. समजूतदारपणा दाखवावा लागेल. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. फार काळजी करू नये.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. काही कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठांशी मिळते-जुळते घ्यावे. एकमेकांतील आपुलकीची भावना वाढीस लागेल. भागीदारीत समाधानी राहाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

जोडीदाराची कमाई वाढेल. चुकीच्या संगतीत अडकू नका. एकमेकांवरील विश्वास महत्वाचा आहे. जोडीदाराचे वर्चस्व राहील. सामंज्यस्य दाखवावे लागेल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

सहजपणे मिळणाऱ्या गोष्टींकडे लक्ष राहील. आवडते छंद जोपासायला वाव मिळेल. कामगारांवर लक्ष ठेवावे. मुलांच्या आनंदात रमून जाल. जुगाराची हौस पूर्ण कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर