grah gochar july 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात होणारे महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर ५ राशींच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याची सुरुवात बुध ग्रहाच्या वक्री (उलट) चालीने होत आहे, तर महिन्याच्या शेवटी शनी देव वक्री होणार आहेत. दोन महत्त्वाच्या ग्रहांची वक्री चाल आणि सूर्याचे कर्क राशीत आगमन होऊन बुधाशी होणारी युती, तसेच यामुळे निर्माण होणारा ‘बुधादित्य राजयोग’ अत्यंत विशेष ठरणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, ४ जुलै २०२६ रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. यानंतर १६ जुलै २०२६ रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल आणि तिथे आधीच उपस्थित असलेल्या बुधाशी युती करेल. त्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी शनी वक्री होईल. दरम्यान, बुध ग्रह २९ जूनपासूनच वक्री झाला आहे. जुलै महिन्यात ग्रहांच्या गोचराव्यतिरिक्त नक्षत्र परिवर्तनही पाहायला मिळेल. तसेच, सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूची अशुभ युतीदेखील होणार आहे. या सर्व ग्रह-नक्षत्रांच्या बदलांचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल ते सविस्तर जाणून घेऊया.
जुलै २०२६ ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना सुख, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित एखादा वाद मिटल्याने मोठा लाभ होईल. व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरदार वर्गासाठी हा काळ प्रगतीचा असेल. कुटुंबासह आनंदात वेळ घालवू शकता.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांना जुलै महिन्यात पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना वेतनवाढ (Increment) मिळू शकते. व्यवसाय विस्तार करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील.
तूळ (Libra)
जुलै महिना तूळ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या मालामाल करू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे अचानक मिळू शकतात. नवीन नोकरीची सुवर्ण संधी चालून येईल. नोकरीत बढती (Promotion) मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक ताण आणि कामाचा बोजा आता कमी होईल. एखाद्या कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै २०२६ हा महिना भाग्योदयाचा ठरेल. विशेषतः विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळवता येऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. एकूणच, तुम्ही प्रत्येक बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि चांगले अनुभव घ्याल.
मीन (Pisces)
मीन राशीवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. २७ जुलै रोजी शनी वक्री होणार आहे, परंतु त्यापूर्वीच मीन राशीच्या लोकांना याचे शुभ फळ मिळण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये नवीन सुरुवात किंवा मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे पैशांची आवक वाढेल. कर्जातून सुटका होईल, मानसिक ताण कमी होईल आणि गरजेच्या वेळी योग्य ती मदत मिळेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
