July Graha Gochar 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. जुलै महिन्यातील सुरुवातीचे १५ दिवस पार पडेल असून आता पुढील १५ दिवस ग्रहांच्या दृष्टीकोनातून खास मानले जात आहेत. ज्यात देवगुरू अस्त होईल, सूर्याचे कर्क राशीतील गोचर आणि शनीची वक्री चाल १२ पैकी काही राशींसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल.

ग्रहांचे गोचर या राशींचे भाग्य बदलणार

वृषभ (Vrushabh Rashi)

ग्रहांचे हे गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशींच्या व्यक्तींसाठीही जुलैचा अर्धा महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर भाग्यकारक असेल. या काळात तुमचे नशीब बदलेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)