July Horoscope: जुलैमध्ये गजकेसरी योगाची निर्मिती १४ जुलैच्या संध्याकाळपासून होणार आहे. कर्क राशीत चंद्र आणि देवगुरू बृहस्पती यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. त्या वेळी चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असतील आणि गुरू २ जूनपासूनच कर्क राशीत आहेत. या दोघांच्या युतीमुळे हा अद्भुत राजयोग तयार होत आहे. गजकेसरीमध्ये ‘गज’ म्हणजे हत्ती आणि ‘केसरी’ म्हणजे सिंह. १४ जुलैपासून तयार होणारा गजकेसरी योग काही राशींसाठी शुभ ठरू शकतो. त्यामुळे त्यांचे नशीब उजळू शकते.
जुलैमध्ये गजकेसरी योग कधीपासून कधीपर्यंत राहणार?
१४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी कर्क राशीत चंद्र आणि गुरू यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. चंद्र १६ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कर्क राशीत राहील. त्यानंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि गजकेसरी योग समाप्त होईल.
गजकेसरी योगाचे फायदे
गजकेसरी योगामुळे धन, सुख, सोयी-सुविधा, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होते. तसेच करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळते. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. बुद्धिमत्ता, पराक्रम आणि धैर्यही वाढते.
‘या’ ५ राशींचे नशीब उजळणार!
मेष राशी (Aries Horoscope)
गजकेसरी योगाच्या काळात मेष राशीच्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही नोकरीच्या नवीन संधी शोधून पुढे जाऊ शकता. वेळ अनुकूल असल्यामुळे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि लोकांचे सहकार्य मिळेल.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना मेहनत करावी लागेल. त्यामुळे करिअरमध्ये नवीन संधी आणि यश मिळू शकते. या काळात तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. योग्य नियोजन करून यश मिळवू शकता. मात्र भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. गुंतवणूक किंवा पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना ज्या संधीची प्रतीक्षा होती, ती या तीन दिवसांत मिळू शकते. करिअरमधील ही महत्त्वाची संधी ओळखा आणि तिचा योग्य फायदा घ्या. यश मिळेल. तुमचे सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. धैर्य आणि पराक्रम वाढेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. नातेसंबंध अधिक गोड आणि मजबूत होतील. मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्या.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि आयुष्य आनंदाने भरून जाईल. या काळात तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे जाल. एखाद्या खास व्यक्तीशी मैत्री होऊ शकते, जी तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. पैशांच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील. गुंतवणूक आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठही आनंदी असतील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. मन शांत ठेवा आणि तणावापासून दूर राहा. या काळात तुम्ही एखादी मोठी खरेदी करू शकता, मात्र खर्चाचाही विचार करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्यास अधिक चांगले राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
