July Horoscope: ४ जुलै २०२६ रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मायावी ग्रह केतू आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत शुक्र-केतू युती तयार झाली आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. त्यामुळे सूर्याच्या राशीत झालेली शुक्र-केतू युती ही अतिशय प्रभावशाली मानली जात आहे.

ज्योतिषाचार्य नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शुक्र हा धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह आहे. तर केतू हा वैराग्य, भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्र आणि केतू एकाच राशीत येतात, तेव्हा त्याला ‘भोग आणि मोक्षाचा संगम’ किंवा ‘धन-वैराग्य योग’ असे म्हटले जाते.

शुक्र आणि केतूचा सर्व १२ राशींवर त्यांच्या स्थितीनुसार प्रेम, नातेसंबंध, करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. सध्या सिंह राशीत झालेली ही युती अनेक राशींसाठी लाभदायक ठरू शकते.

शुक्र ग्रह १ ऑगस्टला सिंह राशीतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत शुक्र-केतूची ही युती कायम राहणार आहे. या काळात तीन राशींचे नशीब बदलू शकते. चला जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी.

सिंह राशीत शुक्र-केतू युती : ३१ जुलैपर्यंत ‘या’ ३ राशींचे नशीब उजळणार

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंद आणि सौभाग्य घेऊन येऊ शकतो. शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. अनेक कामांमध्ये यश मिळेल आणि एखादे जुने स्वप्न कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकते.

व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची प्रतीक्षा संपेल. नोकरी करणाऱ्या काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा मोठी संधी मिळू शकते.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि त्याचा चांगला फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊ शकतात आणि तुमचे कौतुकही करतील.

व्यवसायात सुधारणा दिसून येईल. कुटुंबीय आणि जवळच्या लोकांची साथ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मानसिक ताण कमी होईल आणि मनाला शांतता मिळेल. खर्च कमी झाल्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत वाटेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. या काळात तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

नोकरी करणाऱ्या काही लोकांना इच्छित पदोन्नती मिळू शकते. प्रवासाचे योग जुळून येतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. गरजेच्या सर्व गोष्टी योग्य वेळी उपलब्ध होतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)