Mahalaxmi Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य आणि देवगुरू यांची युती अत्यंत शुभ आणि प्रभावशाली मानली जाते. हे दोन्ही मोठे ग्रह एकत्र आले की राजयोग तयार होतो. यावर्षी १६ जुलै २०२६ रोजी अशीच एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. सूर्यदेव मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आधीपासूनच ज्ञान आणि भाग्याचे कारक गुरु विराजमान आहेत.
कर्क राशीत सूर्य आणि गुरु यांचा हा मिलाप नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोगासारखी शुभ स्थिती निर्माण करत आहे. १६ जुलैपासून तयार होणाऱ्या या महायुतीचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला, तरी ३ भाग्यवान राशींचे नशीब विशेष चमकणार आहे. या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी प्रगती, अचानक धनलाभ आणि समाजात मान-सन्मान मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
या ३ राशींचे सुरू होतील चांगले दिवस (Lucky Zodiac Signs)
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरु यांची ही युती चौथ्या भावात होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुख-सुविधा वाढवणारा ठरेल. तुम्ही अनेक दिवसांपासून नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळू शकते. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतूनही मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा गोचर धनभावात म्हणजेच दुसऱ्या भावात होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होईल. अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. तुमच्या बोलण्यात वेगळाच प्रभाव दिसून येईल, त्यामुळे व्यावसायिक व्यवहार तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नफ्याचे नवीन मार्ग मिळतील आणि बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होऊ शकते.
कर्क रास (Cancer)
सूर्य आणि गुरु यांची ही युती कर्क राशीतच होत असल्यामुळे सर्वाधिक सकारात्मक परिणाम या राशीच्या लोकांना मिळणार आहेत. तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन आणि अधिक चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत सुरू असलेले जुने वाद कायमचे मिटू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
