त्रिपुष्कर योग हा एक विशेष शुभ योग आहे. तिथी, वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. रविवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी द्वितीया, सप्तमी किंवा द्वादशी तिथीसोबत काही विशेष नक्षत्रांचा संयोग झाल्यास त्रिपुष्कर योग तयार होतो.

त्रिपुष्कर योग राशिभविष्य

१६ जून रोजी तयार होणाऱ्या त्रिपुष्कर योगाचा अनेक राशींवर शुभ परिणाम होणार आहे. हा योग मेष, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. चला, या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना या योगामुळे आर्थिक लाभ होईल. तुमच्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना या योगामुळे लाभ मिळेल. आयुष्यात प्रगती होईल. आर्थिक यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी त्रिपुष्कर योग शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. धनलाभाचे योग तयार होतील. तसेच ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळेल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

त्रिपुष्कर योग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक यश मिळेल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. या योगानंतर यश मिळण्याचे योग तयार होतील.

त्रिपुष्कर योगाचा प्रभाव

त्रिपुष्कर योगाचा प्रभाव या राशींवर दिसून येईल. या शुभ योगामुळे या राशींच्या लोकांना विविध क्षेत्रांत लाभ मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)