Guru Gochar 18 June Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार भाग्य आणि संततीचा कारक मानला जाणारा गुरु ग्रहाचा गोचर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या गुरु ग्रह संथ गतीने प्रवास करत कर्क राशीत प्रवेश केला आहे.

पंचांगानुसार, सध्या गुरु पुनर्वसू नक्षत्रात स्थित आहे, मात्र लवकरच तो नक्षत्र बदलणार आहे. १८ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी गुरु शनीच्या अधिपत्याखालील पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि १८ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहील. शनीच्या नक्षत्रात होणारे गुरुचे हे गोचर काही राशींसाठी विशेष लाभदायक आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार आहे.

धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)

धनु राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ मानले जात आहे. गुरुच्या प्रभावामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign)

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या पुष्य नक्षत्रातील गुरुचे गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे अधिक वळेल. प्रेमसंबंधांमध्ये आनंद राहील. लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. पदोन्नतीच्या अनेक संधीही मिळू शकतात.

कन्या राशी (Virgo Zodiac Sign)

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे गोचर सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मित्रांची चांगली मदत मिळेल. या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)