2 June Horoscope: २ जूनला गुरु ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत प्रवेश करताच सिंह राशीत असलेल्या केतूसोबत गुरु द्विद्वादश योग निर्माण करेल. कारण केतूची स्थिती गुरुच्या द्वितीय भावात असेल, तर गुरु केतूपासून द्वादश भावात असेल. हे दोन्ही ग्रह ज्ञान आणि अध्यात्माचे कारक मानले जातात. त्यामुळे गुरु-केतू यांच्यात तयार होणारा द्विद्वादश योग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. चला, या राशींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मेष राशी (Aries Horoscope)

द्विद्वादश योग तुमचे ज्ञानाचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. तुम्ही तुमची क्षमता ओळखाल आणि कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करू शकता. वैद्यकीय आणि वनस्पती विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. काही लोकांना या काळात उच्च पदाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. पंचम भावातील केतू आणि चतुर्थ भावातील गुरु यामुळे कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.

कर्क राशी (Cancer Horoscope)

२ जूनला गुरुचा गोचर तुमच्या स्वतःच्या राशीत होणार आहे. तर केतू तुमच्या वाणी आणि धनाच्या द्वितीय भावात आहे. त्यामुळे जनसंपर्क, विक्री, मार्केटिंग अशा क्षेत्रांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. द्विद्वादश योगाच्या प्रभावामुळे मनासारख्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असून द्विद्वादश योगामुळे तुमचा अष्टम भाव सक्रिय होईल, तर केतू नवम भाव सक्रिय करेल. त्यामुळे गूढ विषय जाणून घेण्याची आवड वाढू शकते. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्येही चांगल्या संधी आणि यश मिळू शकते. तसेच तुम्ही आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल. आधीपासून अध्यात्माच्या मार्गावर असाल तर या काळात चांगले अनुभव येऊ शकतात.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

द्विद्वादश योगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवरही दिसून येऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात चांगले अनुभव मिळतील. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव लोकांना आकर्षित करेल. या काळात एखाद्या आध्यात्मिक गुरूची भेट तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीचे लोक आपल्या विरोधकांवर मात करण्यात यशस्वी ठरू शकतात. मात्र आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)