Panchank Yog: ज्योतिष शास्त्रात पंचांक योगाला खूप महत्त्व आहे. हा योग दोन ग्रह एकमेकांपासून ७२ अंशांवर आले की तयार होतो. हा योग कोणत्याही दोन ग्रहांच्या संयोगाने कधीही तयार होऊ शकतो आणि याचा राशींवर साधारणपणे चांगला परिणाम दिसतो. जून २०२६ मध्ये मंगळ आणि गुरु यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या पंचांक योगामुळे काही राशींना फायदा होणार आहे. चला, आता या योगाची तारीख, वेळ आणि परिणाम जाणून घेऊया.
पंचांक योग कधी तयार होणार
द्रिक पंचांगानुसार, ५ जून २०२६ रोजी मंगळ आणि गुरु हे एकमेकांपासून ७२ अंशांवर असतील, त्यामुळे पंचांक योग तयार होईल. त्या दिवशी सकाळी १० वाजून २९ मिनिटांपासून या योगाचा प्रभाव राशींवर दिसू लागेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
जुन्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तणाव कमी राहील. आर्थिक स्थितीत चांगली वाढ होईल. तसेच आरोग्यही चांगले राहील.
सिंह राशी (Leo Horoscope)
तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. विचार करून निर्णय घेतल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल. तसेच प्रेमसंबंधात संतुलन राहील, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुम्ही तुमचे विचार चांगल्या प्रकारे मांडू शकाल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. तसेच नातेसंबंध सुधारतील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
तरुणांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. या काळात घाईत घेतलेले निर्णयही व्यवसायात फायदा देऊ शकतात. मनासारखी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. तसेच नात्यांमधील गोंधळ बऱ्याच प्रमाणात दूर होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
