Shukra Guru Yog June Horoscope: प्रेम आणि सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि भाग्य व ज्ञानाचा कारक गुरु ग्रह ०° वर येऊन युती दृष्टी योग तयार करत आहेत, जो खूप शक्तिशाली आणि सकारात्मक योग मानला जातो. शुक्र-गुरुचा हा युती दृष्टी योग १० जून २०२६, बुधवारी मध्यरात्री ०१:२६ वाजता तयार होणार आहे. दोन्हीही शुभ ग्रह असल्यामुळे ०° वर झालेल्या या योगाचा ४ राशींच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया त्या ४ राशी कोणत्या आहेत.
सिंह राशी (Leo June Horoscope)
शुक्र-गुरुचा हा योग सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहेत. नशिबाची साथ मिळाल्यामुळे मोठ्या-छोट्या अडचणी दूर होऊ शकतात. जीवनसाथी किंवा पार्टनरचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याचे योग आहेत. काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे.
तूळ राशी (Libra June Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्रचा हा योग लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणि समज वाढू शकते. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक दुरावा कमी होईल. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि धनलाभाच्या अनेक संधी मिळतील.
धनु राशी (Sagittarius June Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र-गुरुचा हा योग सर्व बाजूंनी लाभाचे मार्ग उघडणार ठरणार आहे. भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीसंबंधी मोठे निर्णय घेऊ शकता. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात.
मीन राशी (Pisces June Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र-गुरुचा हा योग खूप शुभ ठरणार आहे. मानसिक शांतता मिळेल. विचारांमध्ये सकारात्मकता येईल. कुटुंबातील लोकांशी संबंध गोड राहतील. जीवनसाथीच्या सहकार्याने मोठ्या अडचणीतून बाहेर पडू शकता. नवीन कामाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
