How is June month for Capricorn : मकर ही शनीची रास आहे. शनी म्हणजे विलंब, अडथळे, कष्ट, शोक असे काहीसे समीकरण आपण मानतो. पण, शनी म्हणजे चिकाटी, काटकसर, संयम, दीर्घोद्योग ,सुत्रबद्धता हेही तितकेच सत्य आहे. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये या दोन्ही छटा दिसून येतात. बऱ्याचदा आपण जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. जिद्दीने, चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मनाला निश्चिंती मिळत नाही.

शनी हा कर्माचे फळ देणारा आणि न्यायाची देवता मानला जातो. म्हणजेच शनि ग्रह माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल दीर्घ काळ विचार आणि कधी कधी संशय, शंका तुमच्या मनात असतात. या व्यक्तींमध्ये जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड असते. महत्वाकांक्षी असतात पण त्यांना उदासीनताही लवकर येते. अशा या मकर राशीच्या व्यक्तींना जून महिना कसा जाणार आहे चला जाणून घेऊ…

जून महिना कसा जाणार?

१ जूनला गुरू सप्तमातील कर्क राशीत प्रवेश करणार आहे; ज्यामुळे तुम्हाला चांगले गुरुबल प्राप्त होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विषय उत्तमरीत्या आत्मसात होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवाल. अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. विवाहोत्सुक मंडळींचा विवाह योग जुळून येतील.

विवाहित मंडळींच्या स्वप्नांना पंख फुटतील. कुटुंबासाठी महत्वाचे निर्णय घ्याल, सर्वांच्या हिताचा विचार कराल. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा उत्तम परतावा मिळेल. फसव्या योजनांकडे आपण कधीच वळणार नाहीत. कामानिमित्त प्रवास होईल, घर, प्रॉपर्टी यांची कामे मार्गस्थ होतील. कष्टाचे चीज होईल. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल. जास्त बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवून द्याल. रक्तदाब सांभाळावा. डोकं शांत ठेवावे.

असा मकर राशीचा जून महिना असणार आहे…