June Numerology 2026 : अंकशास्त्रानुसार, जून महिना ३ विशेष मूलांक असलेल्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. या काळात या लोकांच्या करिअरमध्ये यशाचे योग येतील. तुमची बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे आता पूर्ण होऊ लागतील. उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि व्यवसायातही बंपर नफा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणते हे ३ लकी मूलांक आहेत.
मूलांक ३
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ३ असतो. जून महिना या मूलांक असलेल्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. या महिन्यात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच, वडीलांच्या संपत्तीतून चांगला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
मूलांक ६
ज्या लोकांचा जन्म ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकाच्या लोकांसाठी जून महिना शुभ राहील. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रात (नोकरीत) तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. घरात एखादे मांगलिक किंवा धार्मिक कार्य संपन्न होऊ शकते.
मूलांक ९
ज्या लोकांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ९ असतो. या मूलांकाच्या लोकांना जून महिन्यात नशीबाती साथ मिळेल. तुमच्या धैर्यात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कोर्ट-कचेरीशी संबंधित वादांमधून सुटका होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे प्रचंड कौतुक होईल.एखाद्या जुन्या आजारातून किंवा रोगापासून आराम मिळू शकतो.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
