June Numerology 2026 : अंकशास्त्रानुसार, जून महिन्यात ३ विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. या जातकांना करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळतील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मनपसंत नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे ३ नशीबवान मूलांक.
मूलांक ३
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ३ आहे. जून महिना या मूलांक असलेल्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. या महिन्यात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल. एखाद्या महत्त्वाच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते, तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मूलांक ६
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या मूलांकाच्या लोकांसाठी जून महिना अतिशय फलदायी राहील. तुमच्या सुख-सुविधा आणि ऐषोआरामात वाढ होईल. कार्यक्षेत्रात (ऑफिसमध्ये) तुमच्यावर एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. बिझनेसमध्ये बंपर नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग येत असून घरात किंवा कुटुंबात एखादे धार्मिक किंवा मांगलिक कार्य संपन्न होऊ शकते.
मूलांक ९
कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. जून महिना या लोकांसाठी खूपच लकी ठरणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात वाढ होईल. कोर्ट-कचेरीशी संबंधित जुने वाद किंवा प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागून ते मिटतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे भरभरून कौतुक होईल. अचानक गुप्त धन किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बऱ्याच दिवसांपासून सतावत असलेल्या एखाद्या जुन्या आजारातून किंवा आरोग्याच्या समस्येतून तुमची सुटका होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
