१५ फेब्रुवारीपासून गुरू-शुक्राच्या कृपेने 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन? प्रमोशनसह मिळू शकतो अपार धनलाभ | Jupiter And Venus Conjunction In Meen These Zodiac Sign There will be promotion and get huge money Marathi Astrology | Loksatta

१५ फेब्रुवारीपासून गुरुच्या कृपेने ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? प्रमोशनसह मिळू शकतो अपार धनलाभ

Jupiter And Venus Conjunction In Pices: गुरु आणि शुक्र यांच्या युतीने काही राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.

Jupiter And Venus Conjunction In Meen
शुक्र आणि गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Jupiter And Venus Conjunction In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. आता गुरू मीन राशीत प्रवेश करत आहे आणि शुक्र १५ फेब्रुवारीला मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे १२ वर्षांनंतर मीन राशीमध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग होईल. ही युती सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु खास करुन या ३ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यांना पैसा, नोकरी, करिअर, प्रेम प्रकरण, व्यवसायात लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

कर्क राशी (Cancer Zodiac)

गुरू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या राशीतून नवव्या घरात होणार आहे. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. दुसरीकडे, बऱ्याच काळापासून बंद असलेल्या व्यवसायात व्यावसायिकांना अचानक पगारही मिळू शकते. यासोबतच तुम्ही काम आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकते. धर्म आणि अध्यात्म या विषयांमध्ये तुमची आवड वाढू शकते. वडिलांसोबतच्या नात्यात बळ येण्याची शक्यता निर्माण होत आहे.

(हे ही वाचा : ७ फेब्रुवारीला ‘भद्रा राजयोग’ घडल्याने ‘या’ राशी होऊ शकतात मालामाल, बुधदेवाच्या कृपेने वर्षभर येणार पैसाच पैसा?)

कुंभ (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बृहस्पति आणि शुक्र यांचा संयोग अनुकूल ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरात होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, ज्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. त्याचवेळी, तुमचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच बृहस्पति ग्रहाच्या प्रभावामुळे अविवाहितांना नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने गुरू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीतील कर्म घरामध्ये तयार होईल. त्यामुळे, यावेळी तुम्हाला बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचे भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देऊ शकेल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छाही तुमची पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:38 IST
Next Story
२ महिन्यांनी शनिदेव बनवणार ‘धन राजयोग’; ‘या’ ३ राशींना वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा