ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा राशी परिवर्तन (गोचर) हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय बदल मानला जातो. आगामी २ जून रोजी रात्री २ वाजून २५ मिनिटांनी देवगुरु बृहस्पति (Jupiter) चंद्राच्या स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे सुमारे १२ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर गुरु आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करत आहेत आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.
या महा-गोचराचा परिणाम मेष ते मीन सर्व राशींवर होणार असला तरी, ६ राशींसाठी हा काळ विशेष शुभ मानला जात आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगती, नवीन नोकरी आणि बंपर आर्थिक लाभाचे योग निर्माण होणार आहेत.
गुरु गोचर इतका खास का आहे?
दिर्घ काळ आणि मंद गतीने चालणारा ग्रह
गुरु (बृहस्पति) हा सौरमालेतील सर्वात विशाल ग्रह मानला जातो. त्याची गती अत्यंत मंद असते. तो एका राशीत साधारणतः १ वर्ष (१२ महिने) राहतो. त्यामुळे गुरु जेव्हा राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आणि खोल परिणाम करणारा असतो.
शुभता आणि प्रगतीचा कारक
ज्योतिषानुसार गुरु हा भाग्य, ज्ञान, विवाह, संतान, धन, विवेक आणि धार्मिक कार्यांचा कारक ग्रह मानला जातो. त्याला सर्वात शुभ आणि परोपकारी ग्रह मानले जाते.
उच्च आणि नीच राशीचा प्रभाव
गुरु जेव्हा चंद्राच्या राशीत कर्कमध्ये असतो, तेव्हा त्याला उच्च स्थिती मानले जाते. अशावेळी तो अत्यंत शुभ आणि प्रभावी परिणाम देतो. तर मकर राशीत तो नीच मानला जातो, जिथे त्याच्या शुभ फळांमध्ये घट होते.
या ६ राशींना गुरु गोचरचा सर्वात मोठा फायदा
मेष राशी (Aries)
मेष राशीच्या जातकांसाठी हा गोचर एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेली आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कर्क राशी (Cancer)
गुरुचा गोचर याच राशीत होत असल्यामुळे कर्क राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. नवीन नोकरी किंवा जॉब बदलण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या करिअर अडचणींना मोठा दिलासा मिळेल.
सिंह राशी (Leo)
सिंह राशीसाठी करिअरमध्ये मोठ्या संधी निर्माण होतील. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. एखादी मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा ट्रान्सफरचे योग आहेत.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी किंवा पद मिळू शकते. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
वृश्चिक राशी (Scrpio)
या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा दिलासा मिळेल. उत्पन्नात वाढ होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील.
मीन राशी (Pieces)
मीन राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल. जुन्या आर्थिक समस्या दूर होतील. विशेष म्हणजे जुने गुंतवणुकीचे (जसे शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी) मोठे रिटर्न मिळू शकतात.
/
