Jupiter Transit 2024 in Mrigashira Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. सुख-समृद्धी, मान-सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व राशींवर होतो. गुरु राशी परिवर्तनसह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचांगानुसार, येत्या २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सध्या गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून ते मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. गुरू ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना जीवनात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. गुरूचा नक्षत्र बदल कोणत्या राशींना सुखावणार, चला तर जाणून घेऊया…

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी (Aries Zodiac)

देवगुरूचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. देवगुरुच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.   

(हे ही वाचा : ७ दिवसांनी शनीकृपेने ‘या’ राशींना मिळेल गडगंज श्रीमंती? कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा, आयुष्याचं होईल सोनं?)

वृषभ राशी (Taurus Zodiac)

देवगुरु नक्षत्र परिवर्तन करताच वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Zodiac)

देवगुरूचं नक्षत्र परिवर्तन कन्या राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. करिअरमध्ये उंच शिखर गाठण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरी आणि व्यापारात यश मिळू शकतो. वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येऊ शकतात. समाजात मान-सन्मानही वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)