Guru Vakri in Mithun 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू बृहस्पती हे ज्ञान, सद्वर्तन, धर्मकारण, वृद्धी, दान, पवित्र स्थळे, शिक्षण, पितृतुल्य आधार, तसेच संतती आणि सौभाग्याचा अधिपती मानले गेले आहेत. पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वाभाद्रपद ही तीन नक्षत्रे गुरूंच्या अधिपत्याखाली येतात, तर धनू आणि मीन या दोन राशी त्यांची स्वतःची मानली जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, ५ डिसेंबर २०२५ रोजी गुरू ग्रह मिथुन राशीत प्रवेश करून वक्री होतील आणि नंतर ११ मार्च २०२६ रोजी मार्गी होऊन त्याच राशीत महत्त्वपूर्ण संचरण करतील. गुरू बृहस्पतींच्या या बदलत्या चालीतून काही राशींना विशेष अनुकूलता लाभू शकते, अशा शक्यता व्यक्त केल्या जातात. करिअर, मान प्रतिष्ठा, धनोपार्जन आणि सामाजिक वर्तुळात वृद्धी अशा अनेक संधी या काळात उजळून दिसू शकतील. या मार्गी हालचालीचा तीन राशींवर अधिक प्रभाव दिसू शकतो, अशी ज्योतिषांची मते आहेत. प्रत्येक राशीवर याचा कसा परिणाम होऊ शकतो ते पाहूया.

२०२६ मध्ये ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडण्याची शक्यता!

मिथुन (Mithun Zodiac)

गुरूंचे मार्गी होणे मिथुन राशीसाठी विशेष तेज घेऊन येऊ शकते, अशी ज्योतिषीय भाकिते केली जातात. गुरू तुमच्या राशीवरूनच मार्गी होत असल्याने, या कालखंडात व्यक्तीच्या विचारांमध्ये व्यापकता येऊ शकते. आत्मविश्वास कमालीचा वाढू शकतो आणि सामाजिक वर्तुळही मोठ्या प्रमाणात विस्तारू शकते. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि नवी ओळख, नवे संबंध यामुळे अनेक अनपेक्षित मार्ग उघडू शकतात.

कौटुंबिक वातावरणही समाधानदायी राहण्याची ही वेळ असू शकते. काहींना सृजनशील उपक्रम किंवा गुंतवणुकीत लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. विवाहितांना सौहार्दपूर्ण वातावरणाचा लाभ होऊ शकतो, तर अविवाहितांसाठी विवाहयोग अधिक मजबूत होण्याची चिन्हे ज्योतिष अधोरेखित करतात. शिक्षण, कलेचे क्षेत्र, लेखन अथवा वक्तृत्व या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक ऊर्जा देणारा असू शकतो.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीसाठी गुरूंचे मार्गी होणे एक प्रकारची गूढ पण सकारात्मक हलचाल दर्शवते, अशी अनेक ज्योतिषांची मते आहेत. गुरू या राशीच्या अष्टम भावातून मार्गी होत असल्याने, काहींना अधूनमधून धनप्राप्तीची, आर्थिक बळकटीची शक्यता दिसू शकते. संततीविषयक आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत अधोरेखित केले जातात. संततीची इच्छा बाळगणाऱ्या दाम्पत्यांसाठी हा काळ आशादायी ठरू शकतो.

मित्र, सहकारी किंवा व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य अधिक सहजपणे मिळू शकते, अशीही भावना व्यक्त केली जाते. शिक्षण, कौशल्यवर्धन किंवा एखादा जुना प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने या कालखंडात काही चांगली प्रगती दिसू शकते. कौटुंबिक नातेसंबंधही अधिक सौम्य, सौहार्दपूर्ण आणि स्थैर्यदर्शक राहण्याची शक्यता यावेळी असते.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीसाठी गुरूंची मार्गी चाल विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण ती थेट ‘उत्पन्न’ दर्शवणाऱ्या भावावर प्रभाव टाकते. गुरूंची एकादश भावातील मार्गी स्थिती, उत्पन्नवाढ, नवीन आर्थिक स्त्रोत आणि गुंतवणुकीतून लाभ मिळण्याच्या शक्यता उजळवते, असे ज्योतिष सांगतात.

या काळात सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकते आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळण्याची शक्यता असते. प्रवास, नवीन भेटीगाठी किंवा संपर्क या राशीच्या व्यक्तींसाठी पुढील संधी उघडू शकतात. काहींना व्यावसायिक क्षेत्रात अनपेक्षित लाभ, मान्यता किंवा साथ मिळण्याची चिन्हेही असल्याचे ज्योतिषशास्त्र अधोरेखित करते. काही ज्योतिषांचा असा विश्वास आहे की शेअर बाजार, सट्टा किंवा बक्षीस योजनांमध्ये काहींसाठी अनुकूलता असू शकते. मात्र, हे सर्व केवळ शक्यतांच्या आधारेच पाहावे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)