Kalbhairav Jayanti Vishesh Daily Horoscope 12 november 2025 : आज १२ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. आज सिद्धी योग जुळून येईल आणि आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे आणि शुक्ल योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ १२ वाजून ०४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज कालभैरव जयंती आहे; ज्याला कालभैरवाष्टमी म्हटली जाते. तर कालभैरव जयंतीला तुमच्या राशीचा कसा जाणार दिवस जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५ (Kalbhairav Jayanti Vishesh Rashi Bhavishya 11 November 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला .
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
