Venus Gochar In Sagittarius : सुखसोयी आणि ऐश्वर्याचा ग्रह शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. पण, या कर्क राशीत आधीच गुरु ग्रह उपलब्ध आहे. त्यामुळे कर्क राशीतील शुक्र आणि गुरुची युती होणार असून अत्यंत शुभ गजलक्ष्मी योग सुद्धा तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गजलक्ष्मी योग हा धन, समृद्धी, प्रगती देणारा योग मानला जातो. त्याचा प्रभाव काही राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार असून महिनाभर या व्यक्तींवर गजलक्ष्मी योगाचा महत्त्वपूर्ण प्रभाव राहील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिती मजबूत होणे आणि कौटुंबिक सुखात वाढ होण्याची चिन्हे दिसतील.

गजलक्ष्मी योग कोणत्या राशीसाठी ठरेल शुभ?

वृषभ

गजलक्ष्मी योग तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. प्रत्येक प्रयत्नात नशीब तुमचे साथ देईल. तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता, व्यवसाय सुरू करण्याची किंवा घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. सामाजिक सन्मान वाढ, नोकरी करणाऱ्यांना बढती तर नवीन जबाबदाऱ्या मिळतील. याव्यतिरिक्त, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या व्यावसायिक प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

कर्क

हा शुभ योग तुमच्याच राशीत तयार होणार असल्यामुळे तुम्हाला विशेष लाभ होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात, महत्त्वाचे प्रकल्प यशस्वी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप आनंद घेऊन येऊ शकतो. सामाजिक आदर वाढेल, आत्मविश्वास अनुभवायला मिळेल. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. तर विवाहित व्यक्तींना नात्यात गोडवा अनुभवता येईल.

धनु

तुमच्यासाठी हा योग आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ तर गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा कौटुंबिक बाबींमध्ये लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, मेहनतीचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. घरातील वातावरण आनंददायी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. या काळात एक मोठी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन सौदे आणि नफ्याच्या संधी मिळू शकतात.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)