Horoscope Predictions, 15th November : १५ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी आज रात्री २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. शुक्रवारी रात्री ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग राहील. तसेच आज भरणी नक्षत्र रात्री ९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असेल.

याशिवाय आज ‘कार्तिक पौर्णिमा’ साजरी केली जाईल. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ साजरी करतात अशी मान्यता आहे. कार्तिक पौर्णिमा हा वर्षभरातील सर्व पौर्णिमांपैकी विशेष मानला जातो. त्याचबरोबर शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी धनप्राप्तीसाठी सर्वात जास्त महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. तर आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करणार का हे आपण जाणून घेऊया…

shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
shani shukra Ardhakedra yog
५ डिसेंबरपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे भाग्य; शनी-शुक्र देणार नुसता पैसा
30 November Rashi Bhavishya In Marathi
३० नोव्हेंबर पंचांग: नोकरीच्या प्रयत्नांना यश ते अचानक धनलाभ, महिन्याच्या शेवटचा दिवस १२ राशींसाठी कसा जाणार? वाचा राशिभविष्य
29 November Horoscope Today
२९ नोव्हेंबर पंचांग: मासिक शिवरात्रीला मेष ते मीनला कसा मिळणार आशीर्वाद? नवीन संधी ठोठावेल दार, वाचा तुमचा कसा असेल शुक्रवार

१५ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

वृषभ:- अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

मिथुन:- आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:- कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.

सिंह:- बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

कन्या:- आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ:- जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

वृश्चिक:- छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:- आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

कुंभ:- आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन:- कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader