Ketu Chandra Yuti Make Grahan Yog : २५ एप्रिलला रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पण, तिथे सिंह आणि केतू आधीपासूनच उपस्थित असल्यामुळे, चंद्र आणि केतूच्या युतीमुळे एक ग्रहण योग निर्माण झाला आहे, जो २८ एप्रिलच्या पहाटे अंदाजे ३ वाजून ३६ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे, येणारे काही दिवस काही राशींसाठी गोंधळाचे असू शकतात. मनाचा कारक असलेला चंद्र आणि मानसिक गोंधळ निर्माण करणारा ग्रह केतू, काही व्यक्तींच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण करू शकतात. तर चंद्र व केतूच्या अशुभ युतीचे नकारात्मक परिणाम कोणत्या राशीच्या नशिबात येणार जाणून घेऊयात…
वृषभ
चंद्र आणि केतू तुमच्या राशीच्या चौथ्या घरात युती करणार आहेत. हे घर सुखाचे स्थान मानले जाते. पण, या घरात होणाऱ्या अशुभ युतीमुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. येत्या काही दिवसांत, बोलताना तुम्ही शब्दांचा काळजीपूर्वक वापर करावा. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
सिंह
तुमच्या राशीत होणाऱ्या चंद्र आणि केतूच्या युतीमुळे तुम्हाला मानसिक गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक स्तरावर चुकीच्या पद्धतीने वागल्यास तुमची प्रतिमा डागाळू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्ही वादांपासून जितके दूर राहाल, तितके चांगले ठरणार आहे.
मीन
चंद्र आणि केतूची तुमच्या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात युती होणार आहे. त्यामुळे, तुम्हाला शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. आपली गुपिते कोणाशीही शेअर करू नका, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. या राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. आरोग्यात चढ-उतार होण्याचीही शक्यता आहे.
