ketu in uttara phalguni nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूला छाया ग्रह म्हटलं जातं. या दोन्ही ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा देखील मानवी जीवनावर अधिक प्रभाव पाहायला मिळतो. राहूप्रमाणेच केतूदेखील त्याच्या ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो. सध्या केतू हस्त नक्षत्रामध्ये विराजमान असून तो येत्या १० नोव्हेंबर रोजी म्हणजेच आजपासून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, १० नोव्हेंबर रोजी केतू उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २० जुलै २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. उत्तराफाल्गुनी हे २७ नक्षत्रांपैकी १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे.

shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

तीन राशींची होणार चांदी

मेष

केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. तुमच्या सुख, समृद्धी अणि धनसंपत्तीत वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. मुलांबाबत मनात असलेली काळजी थोडी कमी होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनाही केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भावंडांमधील नातं पूर्वीपेक्षा चांगले होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सोशल मीडिया, बँकिंग क्षेत्रतील व्यतक्तींसाठी अनुकूल काळ आहे.

हेही वाचा: पुढचे १४१ दिवस नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

सिंह

केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सिंह राशीच्या व्यक्तींनाही अत्यंत चांगला परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमेल. नव्या गोष्टी खरेदी कराल. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. अडकलेले पैसे परत मिळवाल आणि कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायात हवी तशी प्रगती होईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader