Ketu Transit: ज्योतिषशास्त्रात केतूला एक रहस्यमय छाया ग्रह मानले जाते. राहूप्रमाणेच केतूचंही स्वतःचं कोणतंही भौतिक अस्तित्व नसतं, पण त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर खूप खोलवर होतो. सध्या केतू सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात आहे आणि डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. त्यानंतर तो नक्षत्र बदलणार आहे.
ज्योतिषशास्त्रात केतूचे महत्त्व
केतूला मोक्ष, आत्मज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माचं प्रतीक मानलं जातं. हा ग्रह माणसाला भौतिक सुखांपासून दूर नेऊन मानसिक शांततेकडे वळवतो आणि मागील जन्मातील कर्मांची फळं देतो, असं मानलं जातं. आयुष्यात अचानक घडणारे बदल, अचानक होणारा फायदा किंवा अनपेक्षित घटना यामागे केतूचा प्रभाव असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
मुख्य राशींवर केतू गोचराचा शुभ प्रभाव
सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात असलेला केतू अनेक राशींसाठी नशीब उजळवणारा ठरू शकतो.
मेष राशी (Aries Horoscope)
हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन मार्गही मिळू शकतात. जुना कोर्ट-कचेरीचा वाद किंवा इतर काही अडचण सुरू असेल, तर त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा करिअरमध्येही चांगले बदल होऊ शकतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
कर्क राशी (Cancer Horoscope)
नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे पुढे प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
सिंह राशी (Leo Horoscope)
कामाच्या ठिकाणी आणि करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. मान-सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढू शकते. मात्र, कौटुंबिक आयुष्यात काही चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे कुटुंबासोबत चांगला संवाद ठेवणं गरजेचं आहे. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
हा गोचर तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो, पण कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणं योग्य ठरेल. करिअरमध्येही हळूहळू चांगले बदल दिसू लागतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
