Ketu Positive Effects: ज्योतिषशास्त्रात केतूला ‘छाया ग्रह’ मानले जाते. केतू हा मोक्ष, अध्यात्म आणि गूढ ज्ञानाचा कारक ग्रह आहे. त्याशिवाय आयुष्यात अचानक घडणाऱ्या घडामोडींसाठीही केतू जबाबदार असतो. केतूची गणना क्रूर ग्रहांमध्ये केली जात असली तरी कुंडलीत तो अनुकूल स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला अत्यंत सकारात्मक आणि शुभ फळ देतो. केतू कोणत्या राशींमध्ये बसून व्यक्तीला सुखद फळ देऊ शकतो, ते पाहूया…
कर्क
या राशीचा स्वामी चंद्र आणि केतू यांच्यात ज्योतिषशास्त्रात शत्रुत्व मानले जाते. तरीही कर्क राशीत बसून केतू व्यक्तीला शुभ परिणाम देऊ शकतो. कर्क ही सौम्य आणि जलतत्त्वाची रास आहे. त्यामुळे जेव्हा मोक्ष व अध्यात्माचा कारक केतू कर्क राशीत येतो, तेव्हा व्यक्ती ज्ञानी आणि समंजस बनते. या राशीत केतू असल्यास व्यक्तीला समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळते, तसेच धनधान्याची प्राप्त होते. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर अशा व्यक्ती धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात अधिक सक्रिय होतात.
वृश्चिक
काही ज्योतिषांच्या मते, वृश्चिक ही केतूची उच्च रास आहे. त्यामुळे वृश्चिक राशीत केतू असणे अतिशय शुभ मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत केतू वृश्चिक राशीत असतो, त्या व्यक्ती विज्ञान, ज्योतिष आणि तंत्र-मंत्र यांसारख्या गूढ विषयांच्या अभ्यासक किंवा तज्ज्ञ असतात. या व्यक्ती साहसी असतात आणि कठीण प्रसंगातही संयम गमावत नाहीत. त्यांना आयुष्यात मोठी यश-प्रतिष्ठा आणि मान-सन्मान प्राप्त होतो.
धनु
केतू हा अध्यात्माचा कारक आहे आणि धनु राशीचा स्वामी (गुरू) हादेखील धर्म व अध्यात्माचाच कारक आहे. त्यामुळे धनु राशीतील केतूची उपस्थिती खूप शुभ मानली जाते. अशा लोकांचा कल बालपणापासूनच धर्म आणि अध्यात्माकडे असतो. त्यांच्यात ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा दिसून येते. आपल्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या जोरावर हे लोक समाजात मोठा मानसन्मान मिळवतात. हे लोक उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक सिद्ध होऊ शकतात. केतूच्या प्रभावामुळे त्यांना आयुष्यात उत्तम आर्थिक प्रगतीही मिळते.
या राशींव्यतिरिक्त मेष, सिंह व मीन राशीतही केतू असणे शुभ मानले जाते.
