Ketu Gochar Horoscope: केतू ग्रह ५ डिसेंबरपर्यंत मघा नक्षत्रात राहणार आहेत. त्यानंतर ते अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतील. केतू ग्रहाच्या या स्थितीमुळे ५ भाग्यवान राशींना फायदा होणार आहे. या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला राहील.
केतू गोचर राशिभविष्य
ज्योतिषांच्या मते, केतू ग्रह मघा नक्षत्रात असल्यामुळे मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना लाभ होईल. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तसेच आर्थिक स्थितीही मजबूत राहील.
मेष राशी (Aries Horoscope)
केतू ग्रह मघा नक्षत्रात असल्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. कामात यश मिळेल. व्यवसायात मोठा व्यवहार झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढल्यामुळे मन आनंदी राहील. नोकरी आणि करिअरसाठीही हा काळ चांगला राहील.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. केतूच्या प्रभावामुळे सकारात्मक विचार राहतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक राहील. विशेषतः विद्यार्थ्यांना केतू मघा नक्षत्रात असल्याचा फायदा होईल. आयुष्यातील तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
केतू ग्रह मघा नक्षत्रात असल्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. आर्थिक लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नातेसंबंध चांगले राहतील. न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
मीन राशी (Pisces Horoscope)
केतू ग्रह मघा नक्षत्रात असल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
