Ketu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. पंचांगानुसार, २०२६ मध्ये केतू चार वेळा नक्षत्र गोचर करेल. केतूचे पहिले गोचर २९ मार्च रोजी मघा नक्षत्रात होईल तर दुसरे गोचर २० एप्रिल रोजी मघा नक्षत्रातच पण स्पष्ट स्वरूपात होईल. तिसरे गोचर २५ नोव्हेंबर रोजी अश्लेषा नक्षत्रात स्पष्ट स्वरूपात होईल आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी पुन्हा अश्लेषा नक्षत्रातच केतू प्रवेश करेल. केतूचे गोचर या काळांत काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.
केतूच्या गोचराने ‘या’ राशींना येणार सुखाचे दिवस
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे गोचर खूप अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
केतूचे हे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी भरपूर यश मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
