Ketu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो.पंचांगानुसार, सध्या केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात विराजमान असून या वर्षातील केतू पहिले नक्षत्र गोचर २९ मार्च रोजी मघा नक्षत्रात सकाळी ०४ वाजून ४९ मिनिटांनी होईल. हे नक्षत्र परिवर्तन नक्कीच काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल.

केतूचे नक्षत्र गोचर घेऊन येणार भरपूर यश-कीर्ती

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मेष (Mesh Rashi)

केतूचे नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)