Kalsarp Yog : ज्योतिषशास्त्रानुसार काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला जातो. असे म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष तयार होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्याचबरोबर हा एक महत्त्वाचा आणि प्रभावी योग सुद्धा मानला जातो. जेव्हा सगळे ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात. तेव्हा हा योग निर्माण होतो.

त्यामुळे अशीच एक विशेष युती ११ मे रोजी होणार आहे, जेव्हा सिंह राशीतील केतू आणि कुंभ राशीतील राहू यांच्यामध्ये सर्व ग्रह एकत्र येऊन हा योग तयार होईल. ही परिस्थिती २६ मे पर्यंत टिकून राहू शकते. असे मानले जाते की, या काळात काही राशींना जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. चला, याचे परिणाम आणि संभाव्य उपाय सविस्तरपणे जाणून घेऊया.

वृषभ

या योगाच्या प्रभावामुळे या काळात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असू शकतात. त्यामुळे कोणत्याही कामात घाई करणे टाळा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम न मिळणे निराशाजनक असू शकते. पण, संयम बाळगणे आवश्यक आहे. २६ मे पर्यंत, आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि आपल्या मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

कर्क

तुमच्यासाठी हा काळ मानसिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. चंद्रावरील राहू आणि केतूच्या प्रभावामुळे तणाव आणि अनावश्यक भीती वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. कौटुंबिक जीवनात, नातेसंबंध ताणले जाऊ नयेत यासाठी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

वृश्चिक

तुम्हाला या काळात कुटुंब आणि निर्णयांच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चुकीचा निर्णय समस्या निर्माण करू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळा. अचानक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

कुंभ

आर्थिक बाबतींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा हा काळ असणार आहे. अगदी किरकोळ निष्काळजीपणामुळेही नुकसान होऊ शकते. रखडलेल्या प्रकल्पांमध्ये अडथळे येऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. हुशारीने गुंतवणूक करा आणि आपल्या आरोग्याची, विशेषतः पोट आणि घशाच्या समस्यांची काळजी घ्या.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)