Ketu Transit 2026 Lucky Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात केतूला रहस्यमय आणि आध्यात्मिक ग्रह मानले जाते. वैराग्य, आत्मचिंतन, अंतर्मुखता आणि आयुष्यात अचानक घडणारे बदल यांच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. सध्या केतू सिंह राशीत मघा नक्षत्रात भ्रमण करीत असल्याचे ज्योतिषीय गणित सांगते. त्यामुळे आगामी काळात काही राशीच्या व्यक्तीं च्या आयुष्यात काम, पैसा, व्यवसाय आणि वैयक्तिक नात्यांशी संबंधित काही बदल घडण्याची शक्यता मानली जाते.

५ डिसेंबरपर्यंत सिंह राशीत राहणार केतू

ज्योतिषीय गणनेनुसार, केतू सध्या सिंह राशीत मघा नक्षत्राच्या वेगवेगळ्या चरणांत भ्रमण करत आहे. साधारण ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तो मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. त्यानंतर ५ डिसेंबर २०२६ रोजी सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल.

सप्टेंबरच्या अखेरीपासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंतचा काळ काही जणांसाठी विशेष ठरू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. या कालावधीत रखडलेली कामे मार्गी लागणे, नवीन संधी समोर येणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत स्पष्टता मिळणे, असे अनुभव येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगळा असू शकतो. मग कोणत्या राशीच्या व्यक्तीं च्या वाट्याला येऊ शकतात अशा संधी? पाहूया…

मेष

कामाच्या ठिकाणी काही काळापासून केलेल्या प्रयत्नांना आता काही प्रमाणात दिशा मिळण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडण्याची शक्यता मानली जाते.

व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादी नवीन डील, ग्राहक किंवा प्रकल्प समोर येऊ शकतो. आर्थिक बाजूनेही हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनलाभाचे काही योग निर्माण होऊ शकतात. कामातून मान-सन्मान मिळण्याची आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यताही वर्तवली जाते. मात्र, मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई न करण्याचा सल्ला दिला जातो.

सिंह

ज्या क्षेत्रात गेल्या काही काळापासून संभ्रमाची स्थिती होती, तिथे आता काही प्रमाणात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता असून, त्यातून स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते.

आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याची शक्यता मानली जाते. अचानक एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता असू शकते. व्यवसायात नवीन कल्पना किंवा नवीन संधी मिळू शकतात. वैयक्तिक आयुष्यात आत्मविश्वास वाढण्यासोबतच जुन्या संभ्रमातून बाहेर पडण्याची शक्यताही आहे.

वृश्चिक

करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाचे बदल या काळात घडण्याची शक्यता ज्योतिषीय मान्यतेनुसार व्यक्त केली जाते. बऱ्याच दिवसांपासून ज्या कामाचा निकाल मिळत नव्हता, त्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नवीन प्रकल्प, कामाची ऑफर किंवा व्यवसायवाढीशी संबंधित प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे.

मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळाल्याने आत्मविश्वास वाढू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची आणि धनलाभाचे मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळाल्यास समाजात किंवा कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यताही मानली जाते. मात्र, एकाच वेळी अनेक निर्णय घेण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवून पुढे जाणे फायदेशीर ठरू शकते.

धनू

दीर्घकाळापासून सुरू असलेली एखादी चिंता किंवा अडचण कमी होण्याची शक्यता या काळात निर्माण होऊ शकते. कौटुंबिक सहकार्य मिळाल्याने मानसिक ताण हलका होऊ शकतो. एखाद्या वादग्रस्त किंवा कायदेशीर प्रकरणात पुढे जाण्याचा मार्ग मिळण्याची शक्यता ज्योतिषीय मान्यतेत व्यक्त केली जाते.

कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूनेही काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. अडकलेले पैसे मिळणे, उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होणे किंवा बचतीकडे अधिक लक्ष देता येणे, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये संवाद वाढल्याने गैरसमज दूर होण्याची शक्यताही आहे.

मीन

काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन दारे उघडण्याची शक्यता या कालावधीत मानली जाते. नवीन प्रकल्प, व्यवसायातील डील किंवा भागीदारीचा प्रस्ताव समोर येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, पदातील बदल किंवा कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते.

आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच धनलाभाचे काही योग निर्माण होऊ शकतात. एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडण्याची शक्यताही आहे. वैयक्तिक आयुष्यात जुना मतभेद संवादातून मिटवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नात्यांमध्ये अधिक स्पष्टता आणि जवळीक निर्माण होण्याची शक्यता मानली जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)