Ketu Horoscope: अध्यात्म, वैराग्य आणि भ्रमाशी संबंधित असलेला केतू ग्रह जीवनात अचानक बदल घडवून आणतो. २५ जानेवारी रोजी केतू नक्षत्र बदलून पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यानंतर २९ मार्च २०२६ पर्यंत केतू याच चरणात राहील.

केतू भाग्य बदलणार

केतूच्या या नक्षत्र गोचराचा आपल्या जीवनातील अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार केतू हा बदल, गूढता, अंतर्मनातील विचार, अचानक घडणाऱ्या घटना आणि मानसिक बदल दर्शवणारा ग्रह मानला जातो. या नक्षत्र बदलाच्या काळात केतूची ऊर्जा संतुलित आणि सकारात्मक फल देणारी राहील, त्यामुळे जीवनात अचानक नवे अवसर, नवी विचारधारा आणि भाग्य बदलण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. ज्योतिषांच्या मते या गोचरामुळे तीन राशींच्या जीवनात विशेषतः करिअर, भाग्य आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी केतूचा हा बदल शुभ ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. जुनी रखडलेली कामे पुढे सरकतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थितीत सुधारणा करणारा ठरू शकतो. मानसिक तणाव कमी होईल आणि सर्जनशील कामांमधून ओळख मिळू शकते. विशेषतः धर्म-अध्यात्म, गूढ विद्या आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. त्यांच्या कामाला योग्य मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवी संधी मिळू शकते. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. मान-सन्मान वाढेल. एखादी मोठी यशस्वी कामगिरी साध्य होऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)