scorecardresearch

१८ वर्षानंतर तूळ राशीत केतु ग्रह करणार प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित कालावधीनंतर संक्रमण करतो. या संक्रमणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो.

Ketu_Grah
१८ वर्षानंतर तूळ राशीत केतु ग्रह करणार प्रवेश, या राशींना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित कालावधीनंतर संक्रमण करतो. या संक्रमणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. छाया ग्रह केतू मंगळाचे अधिपत्‍य असलेल्या वृश्चिक राशीतून १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:१८ वाजता शुक्राचे अधिपत्य असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतू ग्रह सुमारे १८ वर्षांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु तीन राशी आहेत ज्यांना या राशीतून विशेष फायदा होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी…

मकर: या राशीला १२ एप्रिलपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण केतू ग्रह तुमच्या राशीच्या अकराव्या स्थानात भ्रमण करेल. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. म्हणून, यावेळी आपण अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळवू शकता. यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार पूर्ण करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

कर्क: केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण केतू ग्रह तुमच्या चौथ्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला सुखाचे स्थान म्हणतात. त्यामुळे केतूची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. ज्यांना विविध भाषा शिकण्यात रस आहे किंवा भाषांतरकार म्हणून करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांचं या काळात लग्न ठरू शकते. त्याचबरोबर तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळेल. यावेळी नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देण्याची शक्यता आहे.

१२ वर्षांनंतर मीन राशीत येणार देव गुरु बृहस्पति, या तीन राशींना येणार ‘अच्छे दिन’

कुंभ: केतूचे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण केतू ग्रह तुमच्या नवव्या घरात प्रवेश करेल, जो स्थानाला घर आणि विदेश प्रवासाचे स्थान मानले जाते. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.तसेच तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही व्यावसायिक प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. तसेच, ज्यांची वेतनवाढ थांबली होती, त्यांना यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. एकंदरीत केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ketu will enter in tula rashi after 18 years rmt

ताज्या बातम्या