Ketu Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. पंचांगानुसार, शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी, छाया ग्रह केतू मघा नक्षत्राच्या पहिल्या स्थानात प्रवेश करेल. केतू हा मघा नक्षत्राचा स्वामी असून, पितृदेव हे त्याचे अधिष्ठाता देवता आहेत. केतू सध्या सिंह राशीत भ्रमण करत आहे. या भ्रमणामुळे सहा राशींना सर्वाधिक लाभ आणि शुभ फळे मिळतील.

केतू घेऊन येणार सुखाचे दिवस

मिथुन (Mithun Rashi)

केतू गोचरामुळे नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान मिळवण्याची इच्छा वाढू शकते. कामात एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. आध्यात्मिक विषयांकडे कल वाढेल. अचानक एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता असून महत्त्वाचे निर्णय अधिक विचारपूर्वक घेता येतील.

मीन (Mithun Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टता वाढवणारा ठरू शकतो. जुन्या अडचणींमधून मार्ग काढण्याची क्षमता वाढेल. आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. कामानिमित्त प्रवास किंवा नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Kanya Rashi)

केतू गोचरामुळे करिअरमध्ये वेगळ्या संधी मिळू शकतात. काम करण्याची पद्धत बदलून अधिक चांगले परिणाम मिळवता येतील. अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीसाठी केतूचा प्रभाव अचानक आर्थिक लाभ आणि नवीन संपर्क निर्माण करणारा ठरू शकतो. सामाजिक वर्तुळात बदल होऊ शकतात. जुन्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावेत.

वृश्चिक (Vruschik Rashi)

या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. कामातील अडथळे कमी होऊन महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांचा फायदा होऊ शकतो.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या लोकांना केतू गोचरामुळे अचानक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामे, नवीन प्रोजेक्ट किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. आध्यात्मिक विषयांमध्येही रस वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)