हिंदू धर्मात खरमासला खूप महत्व आहे. जेव्हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतो तेव्हापासून खरमास सुरु होतो. यंदा शनिवार १६ डिसेंबरपासून खरमास सुरू होत आहेत. दुपारी ०४:०९ वाजता सूर्य धनु राशीत प्रवेश करेल आणि तेव्हापासून खरमास सुरू होईल आणि १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपेल. हिंदू धर्मानुसार, या ३० दिवसात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई असते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, खरमास महिन्यात काही राशींवर याचा शुभ परिणाम दिसून येऊ शकतो. हा महिना तीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशींना या काळात भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी. 'या' राशींना होणार धनलाभ? मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात या राशीतील लोकांना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता दिसत आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहू शकते. कामात मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे या काळात मार्गी लागू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकते. या दिवसांत अधिक प्रमाणात बचत करता येऊ शकते. कुटुंबातील वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा : १०० वर्षानंतर दोन ‘शुभ राजयोग’ जुळून आल्याने जानेवारीपासून ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? बुधदेव देऊ शकतात बक्कळ पैसा ) मिथुन राशी मिथुन राशींच्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंधांमध्ये सुरू असलेल्या अडचणी या काळात दूर होऊ शकतात. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते. परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. धनु राशी धनु राशीच्या लोकांना या काळात चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. भागीदारीत केलेल्या कामात चांगलं फळ मिळू शकतं. कामाचा विस्तार होऊन नफा मिळविण्याच्या संधी मिळू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकते. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)