ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली पाहून त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. त्याचप्रमाणे, सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीरावर असलेल्या चिन्हांवरून आणि अवयवांचे विश्लेषण करून व्यक्तीच्या नशिबाबद्दल सांगितलं जातं. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की शरीराच्या अवयवांची रचना व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगण्यास सक्षम आहे. हे शास्त्र समुद्र ऋषींनी लिहिले होते, म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असेही म्हणतात. अनेक लोक याला अंगशास्त्र या नावानेही ओळखतात. आज आम्ही तुम्हाला हाताच्या बोटांवरून माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत.

पातळ बोटं असलेले लोक:

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्या लोकांची बोटं पातळ असतात त्यांचे आरोग्य चांगले असते. तसेच, हे लोक खूप सर्जनशील आणि बुद्धिमान असतात. हे लोक इतरांकडून फार अपेक्षा ठेवत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बळावर करतात. तसेच, या लोकांना नातेसंबंध चांगले कसे हाताळायचे हे माहित असते आणि इतरांच्या सुख-दु:खाचा खूप विचार करतात. असे लोक मोकळ्या मनाचे असतात आणि स्वतःच्या धुंदीत राहतात. त्यांचे मन खूप स्वच्छ असते आणि ते सर्वांना खूश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. हे लोक मनी माइंडेड असतात.

जाड बोटं असलेले लोक:

जाड बोटं असलेले लोक काम आणि नातेसंबंधांबाबत खूप गंभीर असतात. असे लोक कंजूष असतात आणि त्यांना पैसे कसे वाचवायचे हे माहित असते. असे लोक रागीट स्वभावाचे असतात आणि लहानसहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो. तसेच करंगळी आणि अनामिका दोन्ही समान असल्यास ती व्यक्ती राजकारणाच्या क्षेत्रात जातात, असे लोक चांगले राजकारणी होऊ शकतात, असं म्हटलं जातं. हे लोक स्पष्टवक्ते, धैर्यवान आणि निर्भय देखील असतात आणि या लोकांना व्यवसायात रिस्क कशी घ्यावी हे माहित असतं.

दयाळू आणि प्रामाणिक:

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचे मधले बोट बाकीच्या बोटांपेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप प्रामाणिक आणि समर्पित असतात. हे लोक अतिशय गंभीर स्वभावाचे असतात आणि प्रत्येक काम मोठ्या समर्पणाने पूर्ण करतात. अशा लोकांना इतरांची फारशी पर्वा नसते. हे लोक खूप आनंदी असतात आणि ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.

लहान बोटं असलेले लोक:

लहान बोटं असलेले लोक आळशी स्वभावाचे मानले जातात. तसंच या लोकांना लॅविश लाईफ जगायला आवडतं. तसेच, या लोकांचे छंद खूप महाग असतात आणि ते पैसे खर्च करण्यावर विश्वास ठेवतात. तसेच ज्या लोकांची करंगळी सुंदर दिसते, ते सर्व गुणांनी संपन्न आणि कलाप्रेमी आणि कला जाणकार असतात.