Shri Krishna Janmashtami 2026: यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ सप्टेंबर रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. शेकडो वर्षांनंतर या वर्षीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अत्यंत दुर्मिळ आणि शुभ ग्रहांची स्थिती जुळून येत आहे. या दिवशी चंद्र आपल्या उच्च राशीत (वृषभ), गुरु स्वतःच्या उच्च राशीत (कर्क), सूर्य स्वतःच्या राशीत (सिंह) आणि शुक्र आपल्या स्वामिनीच्या राशीत (तूळ) विराजमान असणार आहेत. ग्रहांच्या या अभूतपूर्व संयोगामुळे महालक्ष्मी योग आणि नवपंचम राजयोगाची निर्मिती होत आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वादाने वृषभ, कर्क, सिंह आणि तूळ या चार राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सुवर्णाक्षरांनी लिहिणारा ठरणार आहे. या राशींवरील आर्थिक संकटे आणि दारिद्र्य दूर होऊन अचानक धनलाभ, व्यवसायात मोठी प्रगती आणि गाडगंज संपत्ती मिळण्याचे योग बनत आहेत.

श्रीकृष्ण जन्माष्टमीला ५ मोठ्या ग्रहांचा महासंयोग

ज्योतिष्यशास्त्रानुसार, या जन्माष्टमीला अवकाशात ७ मुख्य ग्रहांपैकी ५ ग्रहांचे अत्यंत शक्तिशाली आणि योग्य स्थितीमध्ये विराजमान असणार आहेत. या दिवशी मनाचा कारक असलेला चंद्र आपल्या उच्च राशी वृषभमध्ये गोचर करणार आहे तर ज्ञान आणि भाग्याचा दाता असलेला गुरू ग्रह आपल्या उच्च राशी कर्कमध्ये विराजमान होत नवग्रह मंडळाला अलौकिक उर्जा देणार आहे त्याचबरोबर आत्माचा कारक असलेला सूर्य आपल्या सिंह राशीत आणि दैत्यांचा गुरू शुक्र ग्रह आपल्या तूळ राशीत विराजमान असणार आहेत. एवढंच नाही तर बुद्धीचा दाता बुध ग्रह आपल्या मित्र ग्रहाच्या राशीत विराजमान होऊन शुभ फळ देणार आहे तर मंगळ आि शुक्राच्या युतीमुळे नवपंचम राजयोग निर्माण होणा आहे जो धन, वैभव आणि ऐश्वर्याचे दार उघडणार आहे.

ज्योतिष्यशास्त्रामध्ये हा काळखंड महाकल्याणकारी मानला जात आहे. ग्रहांच्या दुर्मिळ महसंयोगाचा शुभ प्रवाभ तसा १२ राशींवर पाहायला मिळू शकतो पण विशिष्ट ४ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी जन्माष्टमी एखाद्या वरदानापेक्षा कमी असणार नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा अनेक प्रमुख ग्रह उच्च राशीत आणि स्वराशीत एकत्र येतात, तेव्हा तो काळ अत्यंत शुभ मानला जातो. ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगाचा शुभ प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल, परंतु ४ राशी अशा विशेष आहेत, ज्यांच्यासाठी ही जन्माष्टमी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही.

वृषभ राशी (Taurus)

जन्माष्टमीला चंद्र तुमच्या राशीमध्ये उच्च स्थानी विराजमान असणार आहे. तुम्हाला मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये मोठी वृद्धी होणार आहे. करिअरमध्ये दिर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होणार आहे. धनसंपत्तीचे आगमन नवे मार्ग उघडणार आहे. नव्या गुंणवणूक करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

कर्क राशी (Cancer)

तुमच्या राशीत चंद्र आणि गुरू उच्च स्थानी विराजमान असल्याने एक अत्यंत दुर्मिळ भाग्यशाली योग निर्माण होत आहे. नोकरदार लोकांना पद्दोन्नती किंवा नवीन नोकरीची चांगली संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना मनासारखा लाभ होऊ शकतो आणि कुटुंबात मंगल आणि धार्मिक कार्याचे आयोजन होईल.

सिंह राशी (Leo)

सूर्य देव आपल्या राशीत सिंह विराजमान असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता गगनाला भिडेल. सरकारी क्षेत्रात किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. वडिलांच्या संपत्तीमधून लाभ मिळण्यासाठी प्रबळ योग आहे आणि अचानक धन लाभाची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra)

तुमच्या जीवनात सुख-सुविधांची पाऊस पडले. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त चांगली होईल. व्यवसायात कमाल डील फायनल होऊ शकते. कला, मीडिया, फॅशन आणि क्रिएटिव फील्ड लोकांसाठी हे वेळ वरदान समान सिद्ध होईल.

जन्माष्टमीला हे उपाय करून मिळवा कृष्णाची कृपा

या शुभ काळात भगवान श्री कृष्णला दहीसाखरेचा नैवद्य दाखवा. तसेत पुजनामध्ये तुळशीपत्राचा समावेश करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.