September Labh Drishti Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या परस्पर कोनीय संबंधांचा अत्यंत खोल प्रभाव मानला जातो. पंचांगानुसार, १ सप्टेंबर २०२६, मंगळवारच्या संध्याकाळपासून बुद्धी व व्यापाराचा कारक बुध ग्रह आणि साहस व ऊर्जेचा कारक मंगळ ग्रह एकमेकांपासून ६० अंशांच्या अंतरावर स्थित असतील. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून तिसऱ्या आणि अकराव्या स्थानात असतात, तेव्हा त्याला ‘त्रि-एकादश योग’ किंवा ‘लाभ योग’ असे म्हटले जाते.
मंगळाचे पराक्रम आणि बुधाची तीक्ष्ण बुद्धी जेव्हा या लाभ योगाच्या माध्यमातून एकत्र येते, तेव्हा अनेक राशींसाठी निर्णयक्षमता, व्यावसायिक यश आणि अचानक धनलाभाचे मार्ग खुले होतात. १ सप्टेंबरपासून बनणाऱ्या या त्रि-एकादश लाभ योगामुळे कोणत्या राशींचे भाग्य बदलणार आहे ते जाणून घेऊया.
मेष (Aries)
मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. बुधासह निर्माण होणारा हा लाभ योग तुमच्या पराक्रमात आणि उत्पन्नात वाढ करेल. तुमच्या कमाईची साधने वाढतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळू शकतात. व्यापारात घेतलेले जोखमीचे निर्णयही तुमच्या बाजूने निकाल देतील. तुमचे नवीन प्रकल्प यशस्वी ठरतील.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या त्रि-एकादश योगाचा सर्वात अनुकूल प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल. कार्यस्थळावर तुमच्या विचारांचे आणि रणनीतींचे भरभरून कौतुक होईल पदोन्नतीचे (Promotion) योग बनत आहेत. मार्केटिंग, लेखन, मीडिया आणि आयटी क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा लाभ योग साहस आणि नेटवर्कच्या बळावर मोठे यश मिळवून देणारा ठरेल. व्यवसायात नवीन आणि मोठे ग्राहक जोडले जाऊ शकतात. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. कुटुंब आणि लहान भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे मालमत्तेशी (Property) संबंधित रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध आणि मंगळाची ही स्थिती उत्पन्न (अकरावे स्थान) आणि नवीन संधींना बळकट करेल. आर्थिक गुंतवणूक किंवा एखाद्या जुन्या योजनेतून अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क निर्माण होतील, जे भविष्यात उपयोगी पडतील.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
