scorecardresearch

६ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब चमकणार? शुक्र व लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

Venus Transit In Mesh: ६ एप्रिल २०२३ पर्यंत शुक्र मेष राशीत कायम असणार आहे. शुक्राचा स्थायी भाव हा प्रेमळ व वैभवस्वरूप आहे.

Lakshmi Blessing Lucky Zodiac signs Shukra Gochar Till April First Week You Can Get Extreme Rich with Money Love Astrology
६ एप्रिल २०२३ पासून ३ राशींचे अच्छे दिन (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shukra Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच १२ राशींवर शुभ- अशुभ स्वरूपात आढळून येऊ शकतो. ग्रहाच्या स्थायी भावानुसार त्याचा प्रभाव ठरतो. ज्योतिष अभ्यासकांच्या महितीनुसार तीन दिवसापूर्वी म्हणजेच १२ मार्च २०२३ शुक्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश घेतला आहे. ६ एप्रिल २०२३ पर्यंत शुक्र मेष राशीत कायम असणार आहे. शुक्राचा स्थायी भाव हा प्रेमळ व वैभवस्वरूप आहे. यामुळे शुक्र मेष राशीत असेपर्यंत काही राशींच्या भाग्यात प्रेम व धनाचा वर्षाव होऊ शकतो. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात धनलाभाचे योग आहेत हे जाणून घेऊया..

६ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब चमकणार?

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या कर्म व अर्थ भावात म्हणजेच गोचर कुंडलीत तिसऱ्या स्थानी शुक्र भ्रमण करणार आहे त्यामुळे येत्या काळात सिंह राशीच्या मंडळींना अपार धनलाभ होण्याची संधी आहे. तुम्ही नकळत समाज हिताचे काम करून जाल यामुळे आपला सन्मान होऊ शकतो. येत्या काळात तुम्हाला कामासाठी पुरस्कार प्राप्त होऊ शकतो व या रूपात लक्ष्मी सुद्धा आपल्या दारी येऊ शकते. तुम्हाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही शुभ कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य संधी लाभू शकते. चैत्र नवरात्र व शुक्र गोचर जुळून आल्याने आपल्याला लक्ष्मी मातेची विशेष कृपा अनुभवता येऊ शकते.

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या पंचम व षष्ठ स्थानी शुक्र गोचर करत आहे. हे स्थान कर्म भाव व लाभाचे मानले जाते. शिवाय गोचर कुंडलीत पंचम स्थानी शनी व राहुचा प्रभाव सुद्धा अधिक आहे. या ग्रहस्थितीनुसार आपल्या राशीला शिक्षणातून अधिक पैसे कमावता येऊ शकतात. तुमच्या नियमित नोकरीतून काहीसा अवधी हातात शिल्लक उरण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो. याच काळात गुंतवणुकीतून प्रचंड लाभ मिळवण्याची संधी आहे.

हे ही वाचा<<गुढीपाडव्याच्या चार दिवस आधीच शनिदेव सोनपावलांनी ‘या’ ४ राशींचे भाग्य पालटणार? लक्ष्मी देईल धनलाभाची संधी

कुंभ (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र चतुर्थ स्थानी भ्रमण करत आहे. कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत शिवाय १५ मार्चला शनिदेव स्वराशीत राहूनच मोठा नक्षत्र बदल करणार आहेत. शुक्र व शनीच्या युतीने आपल्या जीवनात महिन्याभरात काही खास बदल होऊ शकतात. तुम्हाला हवी असणारी संधी हातातोंडाशी येऊ शकते पण तुम्ही सतर्क राहून ही संधी व वेळ ओळखायला हवी. तुम्हाला धनलाभ होताना खर्च सुद्धा वाढू शकतो पण तुम्ही जितकी अधिक गुंतवणूक कराल तितका अधिक लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 11:13 IST