Lakshmi Narayan Rajyog: ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांना सुख, समृद्धी, धन आणि बुद्धीचे कारक मानले जाते. कुंडलीत शुक्र आणि बुध यांची युती झाली की लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. पंचांगानुसार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी तयार होणारा हा ज्योतिषीय योग काही राशींसाठी खास शुभ मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या राजयोगाचा चांगला परिणाम करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सुख-सुविधांवर दिसू शकतो.

फ्यूचर पंचांगानुसार, २२ नोव्हेंबर रोजी धनाचा कारक असलेला शुक्र ग्रह सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करेल. या राशीत बुध ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. हा राजयोग २ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

मेष राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुध यांचा हा संयोग शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन व्यवहार मिळण्याची आणि नफा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.

मकर राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कर्क राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. नोकरीत तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहू शकते. नवीन काम सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)