Lakshmi Narayan Yoga : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत शुभ राजयोग निर्माण करतात. शुक्र ग्रह १२ जून रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर १४ जून रोजी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील राशींवर दिसून येईल. पण तीन राशी अशा आहेत ज्यांचे नशीब चमकू शकते. त्याचबरोबर या राशींच्या लोकांना धन संपत्ती मिळू शकते तसेच या लोकांची आर्थिक वृद्धी दिसून येईल. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या? मिथुन राशी मिथुन राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग फायद्याचा ठरू शकतो. कारण हा राजयोग मिथुन राशीच्या लग्न भावमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळी या राशीच्या व्यक्तिमत्त्वावर याचा परिणाम दिसून येईल. त्याचबरोबर बुधचा शुभ प्रभाव या राशीच्या करिअरवर दिसून येईल. या लोकांना चांगल्या संधी मिळेल. या दरम्यान या लोकांना पदोन्नतीविषयी आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात समृद्धी नांदेल. त्याचबरोबर जे अविवाहित आहे, त्यांचे विवाहाचे योग जुळून येईल. या लोकांनी ठरवलेली कामे मार्गी लागतील. हेही वाचा : बक्कळ पैसा कमावणार! तब्बल १० वर्षांनंतर मिथुन राशीत निर्माण होणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य सिंह राशी लक्ष्मी नारायण राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. हा राजयोग या राशीचे कमाई आणि लाभ स्थानावर आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांच्या कमाईमध्ये वाढ होईल. तसेच पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना मोठे पद मिळू शकते. येणारा काळ या लोकांसाठी खूप चांगला राहील. गुंतवणूकीत लाभ दिसून येईल. याशिवाय शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये सुद्धा नशीब उजळू शकते. कन्या राशी या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरू शकतो कारण या राशीच्या कर्म स्थानावर लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचे सर्व कामांमध्ये आणि व्यवसायात यश मिळू शकते. या दरम्यान या लोकांच्या यश आणि कमाईमध्ये वृद्धी होईल. नोकरीमध्ये नवीन नवीन संधी मिळू शकतात. जे लोक व्यवसाय करतात, त्यांना या काळात धनलाभ मिळू शकतो. त्याचबरोबर व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याचबरोबर जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी मिळू शकते. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)