Vaishakh Purnima 2024: शास्त्रात प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी-नारायण यांची पूजा-आराधना केल्यास कुटुंबात सुख-समाधान, शांती, संपत्ती नांदते. २३ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा हा शुभ दिवस १२ राशींतील काही विशेष राशींसाठी खूप खास असेल. या दिवशी या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

वैशाख पौर्णिमा ‘या’ राशींसाठी लाभदायी

मेष

After 100 years Navpancham Raja Yoga was created Jupiter and Ketu
सुखाचे दिवस येणार! गुरू आणि केतू ‘या’ तीन राशींचे चमकवणार भाग्य; सिंह राशीत निर्माण झाला ‘हा’ दुर्मीळ राजयोग
guru shukra yuti created gajlakshmi rajyog these zodiac signs will get money wealth astrology horoscope
Gajlakshmi Rajyog : १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस? त्या राशी कोणत्या, जाणून घ्या
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Next 45 Days Shani Maharaj Will Turn 180 Degree Saturn Sadesati
४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर
For the next 76 days, the fortunes of these three zodiac signs
पुढचे ७६ दिवस ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; बुध देणार यश, कीर्ती अन् बक्कळ पैसा
Blessing Of Maa Laxmi
डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी
People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
Surya Gochar 2024
वाईट काळ संपणार! १ जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ४ राशींचे नशीब? सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती 

वैशाख पौर्णिमेचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

मिथुन

वैशाख पौर्णिमेचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठीही वैशाख पौर्णिमेचा दिवस खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठीही वैशाख पौर्णिमेचा काळ अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

हेही वाचा: पुढचे २४ दिवस महत्त्वाचे! देवगुरू बृहस्पतींची चाल ‘या’ तीन राशींना देणार ऐश्वर्य, सुख-समृद्धी अपार

मीन

मीन राशीच्या लोकांसाठीही वैशाख पौर्णिमेचा काळ आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)