Lord Shiva Favourite Mulank: ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण अशा काही मुलांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर भगवान महादेवाची विशेष कृपा असते. या मुलांकाच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतेही संकट आले तरी त्यापासून सहज त्यांची सुटका होते शिवाय वैवाहिक जीवनातही सुख शांतता नांदते.

‘या’ मुलांकाच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा

मुलांक २

ज्या व्यक्तींचा जन्म २,११, २०,२९ या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक २ असतो. मुलांक २ वर चंद्र ग्रहाचा अधिक प्रभाव पाहायला मिळतो. शास्त्रात चंद्र आणि महादेवाचा संबंध खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. शिवाय महादेवांच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे. त्यामुळे या मुलांकावर चंद्रासह महादेवाची देखील विशेष कृपा असते. महादेव यांना प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात. या लोकांवर कोणतेही संकट सहज येत नाही. तसेच या लोकांना महादेव मेहनतीनुसार फळ देतात.

मुलांक ८

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक ८ असतो. हा मुलांकावर शनीचा अधिक प्रभाव असतो. शनीदेव देखील महादवाचे खूप मोठे भक्त आहेत. जो व्यक्ती महादेवाची पूजा-आराधना करतो त्यांच्यावर भगवान शिवाची विशेष कृपा असते. या लोकांवर शिवची अपार कृपा दिसून येते. या लोकांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हे लोक सुखी आणि समाधानी राहतात.

मुलांक ७

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ७, १६,२५ या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक ७ असतो.भगवान शिव यांना ७ हा आकडा खूप आवडतो. या मुलांकावर केतू ग्रहाचे वर्चस्व असते. केतूच्या अधिपत्यामुळे, हे लोक आध्यात्मिकदृष्ट्या प्रवृत्त असतात आणि भगवान महादेवावर यांची विशेष श्रद्धा असते. महादेवाचा आशीर्वाद या लोकांना खूप लवकर प्राप्त होतो. या लोकांना कष्टानुसार त्यांच्या मेहनतीचे फळ मिळतात. शिवच्या कृपेने हे लोक आयुष्यात खूप पुढे जातात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)