Lucky Day by Zodiac Signs: सनातन धर्म मानणाऱ्या लोकांसाठी शुभ आणि अशुभ वेळेला खास महत्त्व असतं. असं मानलं जातं की, शुभ वेळेत केलेली कामं यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, शुभ मुहूर्तासोबतच तुमचा शुभ दिवस कोणता आहे हेही तुम्हाला कळू शकतं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा शुभ दिवस सांगितला आहे. त्या दिवशी मनापासून केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असते. येथे तुम्ही १२ राशींचे शुभ दिवस सविस्तर जाणून घेऊ शकता.
सोमवार (Cancer Lucky Day Monday)
चंद्र ग्रहाची रास असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरू करणे किंवा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरतं.
मंगळवार (Aries, Scorpio Lucky Day Tuesday)
फक्त एक नाही तर दोन राशींसाठी मंगळवार शुभ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळवारी केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते.
बुधवार (Gemini, Virgo, Aquarius Lucky Day Wednesday)
मिथुन राशीसोबतच कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांसाठीही बुधवार शुभ मानला जातो. हा दिवस भगवान गणेशांना समर्पित आहे. या दिवशी त्यांची कामं लवकर पूर्ण होतात आणि मन शांत राहतं.
गुरुवार (Sagittarius, Pisces Lucky Day Thursday)
धनु आणि मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी नवीन काम सुरू केल्यास त्यात त्यांना सहज यश मिळू शकतं. तसेच आयुष्यात पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळतात.
शुक्रवार (Taurus, Libra Lucky Day Friday)
माता लक्ष्मीला समर्पित असलेला शुक्रवार वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असतो. या दिवशी त्यांना बहुतेक कामांमध्ये चांगले परिणाम मिळतात.
शनिवार (Capricorn Lucky Day Saturday)
शनीदेवांना समर्पित शनिवार मकर राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी त्यांच्या मनाप्रमाणे कामं पूर्ण होतात आणि मन शांत राहतं.
रविवार (Leo Lucky Day Sunday)
सूर्य ग्रहाची रास असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी रविवार शुभ असतो. हा दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे. या दिवशी त्यांना मेहनतीचं फळ मिळतं आणि मन आनंदी राहतं.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
