Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमच्या करिअरमधील, स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. दरम्यान, आज आपण अशा मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या सासरकडच्यांसाठी खूप लकी असतात.
‘या’ मुलांकाच्या मुली असतात सासरसाठी लकी
मुलांक ३
कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक ३ असतो. ३ मुलांकावर देवगुरू बृहस्पतीचे वर्चस्व असते. गुरू ज्ञान, शिक्षण, मार्गदर्शन आणि अध्यात्म दर्शवितो. त्यामुळे या मुलांकाच्या मुली स्वभावाने हुशार, ज्ञानी, धार्मिक आणि नम्र असतात. या मुली कतृत्ववान असतात आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात भरपूर यशस्वी होतात. यांच्या जन्मापासूनच यांच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदू लागते शिवाय यांच्या विवाहानंतर देखील या आपल्या पतीसाठी आणि सासरकडच्यांसाठी भाग्योदय घेऊन येतात. यांच्या विनम्र आणि सज्जन स्वभावाने या सर्वांचे मन जिंकतात आणि कमी वेळात सासरी आपले स्थान निर्माण करतात. यांच्या अशा स्वभावामुळे यांच्या सासरी यांना योग्य तो मान दिला जातो शिवाय या आपल्या कुटुंबात आनंद आणि सुख निर्माण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
प्रेमसंबंध आणि समाजात प्रसिद्धी
मुलांक ३ असलेल्या मुलींचे प्रेमसंबंध देखील खूप चांगले असतात. या आपल्या प्रियकरावर मनापासून प्रेम करतात आणि त्याच्या प्रत्येक सुख-दुःखात त्याची साथ देतात. शिवाय मुलांकाच्या मुलींना समाजात भरपूर मानसन्मान आणि प्रसिद्धी देखील मिळते.
मुलांक ६
ज्या मुलींचा जन्म ६, १५,२४ या तारखेला झालेला आहे अशा मुलींचा मूलांक ६ आहे. या मुली अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. या मूलांकावर शुक्र ग्रहाचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे या मुलींना नृत्य, चित्रकला, संगीत अशा विविध कला अवगत असतात. या स्वभावाने शांत आणि समजुदार असतात, कठीण परिस्थितीतही शांत राहणं, संयम बाळगणं असा गुण यांच्यात पाहायला मिळतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने देवी लक्ष्मीचा देखील यांच्यावर खूप आशीर्वाद असतो त्यामुळे यांच्या पायगुणाने घरात समृद्धीचा वास होतो.
मुलांक ३ असलेल्यांसाठी २०२६ कसे जाणार?
अंकशास्त्रानुसार, २०२६ हे वर्ष काहीसे आव्हानात्मक असेल. मात्र, ते काहीतरी शिकवेलही. हे वर्ष तुम्हाला कमी आराम आणि जास्त मेहनत करण्याची शिकवण देईल. गुरू ग्रहाचे वर्ष असल्याने तुम्हाला तुमचे मार्ग सापडतीलच. मात्र पैसा सहजासहजी मिळणार नाही. स्थिरावण्याच्या संधी मिळतील मात्र संयम आणि प्रयत्नांमधील सातत्य आवश्यक आहे.
मुलांक ६ साठी कसे जाणार २०२६?
२०२६ हे वर्ष सूर्याच्या प्रभावाने चालणार असल्याने मूलांक ६ च्या व्यक्तींना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. अडकून राहिलेले कामे पूर्ण होताना दिसतील. नोकरीत प्रगती, बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणात चांगले यश, स्पर्धा परीक्षेत अपेक्षित निकाल आणि स्वयंविकासासाठी विशेष वेळ मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
