Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा सरकारी नोकऱ्यांसाठी कारक ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की, ज्यांच्या कुंडलीत या ग्रहाचे स्थान बलवान असते, त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. अंकशास्त्रानुसार ज्यांचा मूलांक १ आहे, त्यांना सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. कारण- सूर्य हा या मूलांकाचा स्वामी मानला जातो. ज्यांचा जन्म १, १०, १९ व २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. चला, हा मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे भविष्य जाणून घेऊ,…
मूलांक १ च्या व्यक्तींचे भविष्य
अंकशास्त्रानुसार, मूलांक १ असलेली मुलं खूप उत्साही असतात. ती अभ्यासातही खूप हुशार असतात. त्यांच्यामध्ये जन्मतःच एक अद्वितीय नेतृत्व क्षमता असते. सूर्याच्या प्रभावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण चमक दिसून येते. ते समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि मोठ्या प्रमाणात आदर मिळवतात.
ज्यांचा मूलांक १ असतो, त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता असते. जर त्यांनी त्या दिशेने पुरेशी मेहनत घेतली, तर त्यांना उच्चपदस्थ अधिकारी बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या मूलांकाच्या व्यक्ती अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. जर त्यांनी मनाशी ठरवले, तर ते काहीही साध्य करू शकतात.
तीक्ष्ण बुद्धी
मूलांक १ असलेल्या लोकांची बुद्धी इतकी तल्लख असते की, ते कोणतीही गोष्ट खूप लवकर शिकतात. त्यांची स्मरणशक्तीही खूप तल्लख असते, ज्यामुळे ते अभ्यासात यशस्वी होतात.
सूर्या हा मूलांक १ चा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या मूलांकासह जन्मलेल्या मुलांना सूर्यदेवाकडून विशेष आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला शासन, अधिकार आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच मूलांक १ असलेले लोक अनेकदा आयएएस, आयपीएस किंवा राजकारणात उच्च पदे मिळवतात.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
