scorecardresearch

Premium

वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? शनिदेवाच्या कृपेने व्यवसायात मिळू शकतो भरपूर नफा

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशींवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे वर्चस्व असते.

Lucky Zodiac Sign
वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होऊ शकतात 'या' राशींचे लोक… (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रात १२ राशींचे आणि २७ राशींचे वर्णन केले जाते. तसेच प्रत्येक राशींवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे वर्चस्व असते. त्यामुळे या राशींशी संबंधित लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा वेगळे असू शकते. तसेच या लोकांची आर्थिक स्थितीही वेगववेगळी असू शकते. तर अशा काही राशी आहेत ज्यांच्याशी संबंधित लोकांचे नशीब वयाच्या तिशीनंतर चमकू शकते. तसेच, हे लोक ३० वर्षानंतर खूप श्रीमंत होऊ शकतात कारण या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. तर या भाग्यवान राशी कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.

कन्या रास (Kanya Zodiac)

atmapomplet
गोष्ट छोटी डोंगराएवढी..
rashi parivartan 2023
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ३ ग्रह एकत्र येताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता
Favourite Zodiac Signs of Lord Ganesha
गणपतीच्या प्रिय राशी कोणत्या? ‘या’ लोकांवर नेहमी असते बाप्पाची कृपा; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Shukra Gochar 2023
शुक्र राशी परिवर्तन करताच ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते नशीबाची साथ

कन्या राशीच्या लोकांचे नशीब ३० वर्षांनंतर चमकू शकते, कारण हे लोक व्यावसायिक मनाचे असतात आणि या राशीचे लोक त्यांच्या व्यवसायाबाबत खूप प्रामाणिक असतात आणि ते खूप कष्टही करतात असं मानलं जातं. वयाच्या तिशीनंतर हे लोक खूप श्रीमंत होऊ शकतात. तसेच ते चांगले लिडर बनू शकतात. ते बुद्धिमान आणि दूरदृष्टीही असतात. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता वयाच्या तिशीनंतर प्रबळ होऊ शकते. या लोकांवर शनिदेव आणि बुध देवाची विशेष कृपा राहण्याची शक्यता असते.

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत असे योग आहेत, ज्यामुळे त्यांचे नशीब वयाच्या तिशीनंतर चमकू शकते. कारण या राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेव या राशीच्या लोकांना खूप हळू परिणाम देऊ शकतात. त्यामुळे या लोकांकडे ३० वर्षांनंतर भरपूर संपत्ती येऊ शकते. या लोकांची जोखीम घेण्याची क्षमता त्यांना यश मिळवून देऊ शकते.

हेही वाचा- शुक्र राशी परिवर्तन करताच ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते नशीबाची साथ

कुंभ रास (Kumbh Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना ३० वर्षांनंतर विशेष यश मिळू शकते. या लोकांची वयाच्या तिशीनंतर करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच हे लोक खूप पैसे वाचवू शकतात. या लोकांमध्ये असणारी जिंकण्याची आवड त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवू शकते. हे लोक मल्टीटास्किंग असू शकतात. तसेच ते त्यांच्या साथीदावर खूप प्रेम करणारे असू शकतात. कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे, जो त्यांना हे गुण प्रदान करतो असं मानलं जातं.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lucky people of this zodiac sign become very rich after the age of thirty with the grace of lord shani one can get huge profits in business jap

First published on: 22-09-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×