कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हिंदू धर्मग्रंथानुसार माता पार्वतीने श्री गणेशाची निर्मिती अंगाच्या मळापासून केली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या वर्षी गणेश जयंती ४ फेब्रुवारीला शुक्रवारी साजरी केली जाईल. माघी गणेश चतुर्थीला, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थीही म्हटलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश जयंती २०२२ तिथी आणि पूजा मुहूर्त

  • चतुर्थी तिथी आरंभ– ४ फेब्रुवारी, शुक्रवार, सकाळी ४ वाजून ३८ मिनिटांपासून
  • चतुर्थी तिथी समाप्ती– ५ फेब्रुवारी, शनिवार, सकाळी ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
  • शुभ मुहूर्त- ४ फेब्रुवारी, शुक्रवार, सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून दुपारी १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत
  • एकूण अवधी- २ तास ११ मिनिटं
  • योग- गणेश जयंतीला दोन शुभ योग आहेत. ४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत रवि योग आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांपर्यंत शिव योग आहे.

गणेश जयंती श्लोक आणि मंत्र

  • वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
  • एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं। विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥
  • विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
  • गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणम्ं।उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्॥
  • रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं।भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात्॥
  • केयूरिणं हारकिरीटजुष्टं चतुर्भुजं पाशवराभयानिं।सृणिं वहन्तं गणपं त्रिनेत्रं सचामरस्त्रीयुगलेन युक्तम्॥
  • अभिप्रेतार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः ।सर्वविघ्नच्छिदे तस्मै गणाधिपतये नमः ॥
  • यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः ।यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः सदा तं गणेशं नमामो भजामः
  • मूषिकवाहन् मोदकहस्त चामरकर्ण विलम्बित सूत्र ।वामनरूप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पाद नमस्ते ॥

Ratha Saptami 2022: रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा कशी करायची? विधी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

गणपती स्तोस्त्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभुः ॥ ५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥
अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi ganesh jayanti 2022 pooja vidhi and muhurt rmt
First published on: 29-01-2022 at 12:58 IST