Maha Shivratri 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री असते. यंदा २०२३ मध्ये १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा योग आहे. असं म्हणतात की महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जो भक्त भगवान शंकर व माता पार्वतीची आराधना करतो त्यास शुभ लाभ होतो अशी मान्यता आहे. पण यंदा ग्रहांच्या स्थितीनुसार महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीपासून काही राशींना धनलाभाचे मोठे योग असल्याचे समजत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य हा कुंभ राशीत प्रवेश घेणार आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीत अगोदरच शनीदेव स्थित असल्याने शनी-सूर्य युती सुद्धा तयार होत आहे. सूर्याच्या प्रवेशांतर महाशिवरात्रीच्या आधी नेमक्या कोणत्या राशींना श्रीमंतीचे योग आहेत हे आपण जाणून घेऊयात..

महाशिवरात्रीला ‘या’ राशींना मिळू शकते अपार श्रीमंती

मेष (Aries Zodiac)

शनीच्या कुंभ राशीत सूर्य व शनीची युती होताच मेष राशीच्या मंडळींना अपार धनलाभाचे योग आहेत. सूर्य आपल्या राशीच्या एकादश (अकराव्या) स्थानी स्थिर होणार आहे. सूर्याच्या प्रभावाने गोचर काळात मेष राशीला भाग्योदयाचे योग तयार होत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल पण यातून आपण वरिष्ठांच्या नजरेत येऊन येत्या काळात प्रमोशनची संधी सुद्धा मिळू शकते. सूर्य व शनीची युती आपल्याला आत्मविश्वास मिळवून देऊ शकते.

Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींना शनी- सूर्य युती लाभदायक ठरू शकते. सूर्य आपल्या राशीच्या चौथ्या स्थानाचा स्वामी आहे व येत्या काळात सूर्य आपल्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. सूर्याचे गोचर होताच आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या नव्या दिशा आपण नक्कीच विचारात घेऊ शकता. आर्थिक स्थितीत मोठा व सकारात्मक बदल होऊ शकतो.

हे ही वाचा<<६ मार्च २०२३ पासून ‘या’ पाच राशींना होणार बक्कळ धनलाभ? शनीचा मूळ राशीत उदय देऊ शकतो अपार श्रीमंती

मकर (Capricorn Zodiac)

सूर्य गोचर कालावधी हा मकर राशीसाठी शुभ ठरू शकतो. सूर्य गोचर आपल्या राशीच्या दुसऱ्या स्थानी होत आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग आहेत. आयीयुष्यात अनेक हवेहवेसे बदल घडून येऊ शकतात. गुंतवणुकीतून धनलाभाची प्रचंड मोठी संधी आहे. नव्या नोकरीची संधी सुद्धा लाभू शकते. येत्या काळात आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

हे ही वाचा<< Pisces Yearly Horoscope 2023: मीन राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहितके यावर आधारित आहे)